Delhi New CM l आज दिल्लीतील राजकीय गदारोळ अधिक तीव्र झाला आहे. आतिशी मार्लेना या दिल्लीचे नवे मुख्यमंत्री असणार असा निर्णय आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीपूर्वीच दिल्लीचे शिक्षणमंत्री आतिशी यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते.
आतिशी मार्लेना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री :
अरविंद केजरीवाल यांची सर्वात विश्वासू व्यक्ती, महिला चेहरा आणि चांगले शिक्षण यामुळे अताशी मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत पुढे आल्याचे मानले जाते. सीएम केजरीवाल तुरुंगात असताना त्यांनी पक्ष आणि दिल्ली चांगली हाताळली होती.मनीष सिसोदिया तुरुंगात असताना आतिशी यांनी शिक्षण खात्याची जबाबदारी घेतली होती.
याशिवाय लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांच्यासमवेत दिल्लीचे विकास काम पुढे नेण्याची क्षमता तिच्यात आहे. दिल्ली सरकारच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री आतिशी त्यांच्या जागी राष्ट्रध्वज फडकावतील असे अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांना लिहिलेल्या पत्रातून सुचवले होते, यावरून सध्या आतिशीचे महत्त्व कळू शकते.
Delhi New CM l आतिशी यांची निवड कशी झाली :
अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांचे नाव आधीच मुख्यमंत्र्यांच्या यादीतून काढून टाकण्यात आले होते, कारण त्यांनी सांगितले की, त्यांना मुख्यमंत्री बनण्यात रस नाही. तसेच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर कोण बसले याने काही फरक पडत नाही.
कारण दिल्लीतील जनतेचा जनादेश अरविंद केजरीवाल यांना होता असे सौरभ भारद्वाज यांनी आधीच सांगितले होते. अशा परिस्थितीत सीएम केजरीवाल यांच्या सर्वात विश्वासू असणाऱ्या आतिशी यांचं नाव आघाडीवर आलं.
महत्वाच्या बातम्या –
News Title : Atishi Marlena Delhi New CM
सोनं पुन्हा 75 हजारांवर, चांदीही सुसाट; आज काय आहेत भाव?
‘या’ 5 राशींना अनंत चतुर्दशी पावणार, बाप्पा देणार सुख-समृद्धी!
PM मोदींचा आज वाढदिवस, 600 हून अधिक भेटवस्तूंचा होणार लिलाव
..तर बंद होऊ शकते SSY खाते; सुकन्या समृद्धी योजनेत झाला महत्वाचा बदल