महाराष्ट्र मुंबई

“निर्लज्ज सरकार…हेलिकॉप्टरच्या बाता मारणाऱ्या सरकारने निवृत्तीनाथांची पालखी एसटीच्या लाल डब्यातून रवाना केली”

मुंबई | हेलिकॉप्टरच्या बाता मारणाऱ्या सरकारने संत निवृत्तीनाथांची पालखी एसटीच्या लाल डब्यातून रवाना केली, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारवर केली आहे. निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं 71 हजार रुपयांचं तिकीट एसटी महामंडळानं घेतल्याच्या बातमीचा आधार घेत भातखळकर यांनी एक ट्विट केलं आहे.

हेलिकॉप्टरच्या बाता मारणाऱ्या सरकारने संत निवृत्तीनाथांची पालखी एसटीच्या लाल डब्यातून रवाना केली, त्याचेही 71 हजार रुपयांचं बिल फाडलं…निर्लज्ज सरकार…, अशा शब्दांत भातखळकरांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय.

 

यंदा कोरोनामुळे पायी आषाढी वारीवर शासनाने निर्बंध घातले. त्यामुळे राज्यभरातील प्रमुख सात संतांच्या पालख्या पंढरपूरला नेण्यासाठी शासनाकडून शिवशाही बस उपलब्ध करून दिली जाईल, असं सुरूवातीला सांगण्यात आलं होतं.

दरम्यान, शासन विनामूल्य बससेवा उपलब्ध करून देणार, असा समज संस्थानच्या विश्वस्तांचा झाला. शासनाकडून कसलाही आदेश प्राप्त झाला नव्हता. अखेर संस्थानने तीन दिवसांच्या मुक्कामाचं 71 हजार रूपये प्रवास भाडे भरल्यानंतर मंगळवारी सकाळी महामंडळाने शिवशाही बस उपलब्ध करून दिली.

ट्रेंडिंग बातम्या-

धक्कादायक! लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू, लग्नात हजर 100 पेक्षा अधिक जणांना कोरोना

‘विठ्ठला मानवाने या संकटापुढे हात टेकले….आतातरी चमत्कार दाखव’; मुख्यमंत्र्यांची विठुरायाला साद

महत्वाच्या बातम्या-

“जे डॉक्टर्स योद्धे बनून लढत आहेत त्यांचं मी कौतुक करतो अन् वचन देतो की….”

‘साहेब माझा विठ्ठल’, पुढचा 1 महिना आव्हाड करणार पवारांवर ‘खास सिरीज’!

तिथे मॅप बदलले जातायेत आणि आपण इथे ॲप वर बंदी घालतोय, आव्हाडांचा मोदींवर निशाणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या