बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आधी लस घ्या मगच पेट्रोल, गॅस आणि रेशन मिळवा; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

औरंगाबाद | देशासह राज्यातही कोरोना लसीकरण मोहिमेने जोर धरला आहे. महाराष्ट्राने मंगळवारी 10 कोटी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या बाबतीत देशात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे पण अजुनही असे काही लोक आहेत जे लस घेण्यासाठी टाळाटाळ करतात.

लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सरकारकडूनही वेळोवेळी निर्देश केले जातात. नागरिक लस घेण्यासाठी प्रवृत्त व्हावं यासाठी सकारकडून अनेक युक्त्या राबवल्या जातात. तर लसीकरण वाढवण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला तरच पेट्रोल,गॅस आणि रेशन मिळणार आहे.

औरंगाबादमध्ये लसीकरणाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. जर आता पेट्रोल, गॅस आणि रेशन मिळवायचं असेल तर कोरोना प्रतिबंधक लसीचा किमान एक डोस तरी अनिवार्य असणार आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी हा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीच्या पहिल्या डोसचे प्रमाणपत्र तपासुनच त्यांना पेट्रोल गॅस आणि रेशन मिळणार आहे. लसीकरणाबाबत नागरिकांत जागरूकता वाढावी आणि जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी यासाठी राज्य सरकारकडून अनेक मोहिमा राबवण्यात आल्या. तर औरंगाबादमधील लसीकरण वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘अनिल देशमुखांचा बळी दिला जातोय’; प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

“नारायण राणेंसारख्या गद्दाराची डाळ शिजू देणार नाही”

“शरद पवारांनाही कळू द्या त्यांचे मंत्री काय कांड करतात ते”

‘या’ बँकेवर RBI ची कारवाई; जर तुम्ही या बँकेचे ग्राहक असाल तर तुम्हाला…

‘या’ शिवसेना नेत्याच्या घरी सुरू होतं सेक्स रॅकेट; पोलिसांकडून पर्दाफाश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More