ग्राहकांना धक्का! आता ATM मधून पैसे काढण्यासाठीही मोजावे लागणार पैसे

ATM Cash Withdrawal Charges | सध्याच्या युगात कॅश व्यवहारांपेक्षा ऑनलाइन व्यवहाराला अधिक प्राधान्य दिलं जातं. पण, अजूनही रोखीने व्यवहार करण्याला पसंती देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. पैसे काढण्यासाठी ग्राहक एटीएमचा सर्वाधिक वापर करतात.पण, आता ATM वापरणाऱ्या ग्राहकांना मोठा धक्का देणारी माहिती समोर आली आहे.कारण, लवकरच एटीएममधून पैसे काढणेही आता महागणार आहे.

म्हणजेच पैसे काढण्यासाठी देखील पैसे मोजावे लागणार आहेत. बँका लवकरच यासंदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा परिणाम होणार आहे.

ग्राहकांना आता एटीएम मधून पैसे काढण्यासाठी जादा पैसे किंवा शुल्क मोजावे लागतील. काही मीडिया रिपोर्टनुसार, भारतातील एटीएम ऑपरेटर्सनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) कडे ग्राहकांकडून रोख पैसे काढण्यावर भरलेली इंटरचेंज फी वाढवण्यासाठी संपर्क साधल्याची माहिती आहे.

पैसे काढण्यासाठी किती शुल्क भरावे लागतील?

CATMI ने म्हटलं आहे की, इंटरचेंज फी प्रति व्यवहार जास्तीत जास्त 23 रुपये वाढवले पाहिजे. तर, एटीएम उत्पादक AGS ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजीजने प्रति व्यवहार 21 रुपये वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. आता याचे दर किती वाढवतात, याबाबत लवकरच माहिती समोर येईल.

ग्राहक एटीएम मधून पैसे काढण्यासाठी (ATM Cash Withdrawal Charges) जे शुल्क भरतात त्याला इंटरचेंज फी म्हणतात.आता जर याचीच फिस वाढली तर ग्राहकांना पैसे काढण्यासाठी जास्त पैसे भरावे लागतील. इंटरचेंज फी एका बँकेकडून दुसऱ्या बँकेला दिली जाते.

ATM मधून पैसे काढणे महागणार

उदाहरण म्हणून पाहिल्यास जर (ATM Cash Withdrawal Charges) तुमच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचे डेबिट कार्ड आहे आणि तुम्ही पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममधून पैसे काढत असाल तर,या व्यवहारासाठी एसबीआयकडून पीएनबीला इंटरचेंज फी भरली जाईल.

सध्या देशात बंगळुरू, दिल्ली, मुंबई, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता येथील बँका बचत बँक खातेधारकांना एका महिन्यात किमान पाच विनामूल्य व्यवहार करण्याची परवानगी देते. तर इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममध्ये तीन व्यवहार विनामूल्य आहे.

News Title-  ATM Cash Withdrawal Charges

महत्त्वाच्या बातम्या-

“उद्या 5 वाजेपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा…”; मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम

‘निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ’; रूपाली ठोंबरे पक्षात नाराज?

पुणे हिट अँड रन प्रकरणी माजी गृहमंत्र्यांना मिळाली अत्यंत धक्कादायक माहिती

अजितदादाने राज्यसभेसाठी घरातल्याच चेहऱ्याला दिली संधी; या नावावर शिक्कामोर्तब

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! फळपिक विम्याची मुदत राज्य सरकारने वाढवली