बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ATM News: पैसे काढणाऱ्यांना झटका, इतके रूपये मोजावे लागणार

मुंबई | देशात सध्या महागाईने सामान्य जनतेचं कंबरडं मोडलेलं आहे. (ATM News) त्यात आता आणखी एका गोष्टीसाठी अधिक खर्च करावा लागणार आहे. तो म्हणजे एटीएममधून पैसे काढण्यासाठी.

आपले पैसे बँकेतून काढण्यासाठी सर्वांत सोयीचा मार्ग म्हणजे एटीएम मशीन (ATM Machine). या मशीनमधून पूर्वी कितीही वेळा पैसे काढता येत होते. पण सर्व सार्वजनिक आणि खासगी बँकांनी आता दरमहा मोफत मर्यादा ग्राहकांना घालून दिली आहे.

बँका शुल्क आकारणार-

व्यवहार संख्येपेक्षा जास्त व्यवहार केले की बँका शुल्क आकारतात. मोफत व्यवहारांची ( Free ATM Transactions ) मर्यादा संपल्यानंतर एटीएम यंत्रातून रक्कम काढण्याव्यतिरिक्त व्यवहार केले तरीही हे शुल्क लागू होतं.

बॅंका शुल्क का आकारतात?

ATM मधून पैसे काढणे ही आपल्यासाठी सोपी बाब असली तरी त्यासाठी बँकांना सोयी कराव्या लागतात. अनेक बँका जागा भाड्याने घेऊन मशिन्स बसवतात त्यामुळे या गोष्टींचा खर्च ते आपल्याकडून वसूल करत असतात.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More