औरंगाबाद | औरंगाबाद शहरात वायजीपुरातील एका 29 वर्षीय तरुणीवर कारमध्ये अत्याचार झाला असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळं औरंगाबादमध्ये खळबळ उडाली आहे.
नोकरी लावून देण्याचं अमिष दाखवून आरोपीनं तरुणीला रात्री नऊच्या सुमारास रामगिरी हॉटेलजवळील स्टॉपवर बोलावलं. त्यानं तरुणीला गाडीत बसवलं आणि गाडी एका ठिकाणी थांबवून अत्याचार केल्याचा गंभीर आरोप तरुणीनं केला आहे.
हा प्रकार 14 नोव्हेंबरच्या रात्री घडला आहे, परंतू अत्याचार करणाऱ्या संशयिताने तरुणीला धमकवल्यामुळं तिनं या प्रकाराची सांगता केली नव्हती. मात्र काही दिवसांनी धीर बळावल्यानंतर 26 डिसेंबर रोजी तरुणीनं घडलेल्या प्रकाराविरोधात पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार आरोपी बीड जिल्ह्यातील असून, आरोपीचं नाव मेहबूब इब्राहिम आहे. आरोपीचा शोध सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
प्रसिद्ध सेक्स एक्सपर्ट डॉ. महिंदर वत्स यांचं निधन!
दिल्लीत धावणार ड्रायव्हरलेस मेट्रो; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं उद्घाटन
तुमच्या ईडीच्या कारवाईला कोण घाबरतंय?- नवाब मलिक
‘चोरी केली तर हिशोब द्यावाच लागेल’; किरीट सोमय्यांचं राऊतांवर टीकास्त्र
ईडीची कारवाई राजकीय हेतूने, आम्ही कुणालाही घाबरत नाही- आदित्य ठाकरे