बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अ‌ॅट्रॉसिटी प्रकरणात विनाचौकशी गुन्हा दाखल होणार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली | अ‌ॅट्रॉसिटी कायद्यात करण्यात येणारी दुरुस्ती घटनाबाह्य नसल्याचा महत्वपूर्ण निर्माण सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता अ‌ॅट्रॉसिटीच्या प्रकरणात कोणत्याही चौकशीशिवाय गुन्हा दाखल करता येणार असून आरोपीला अटकपूर्व जामीनही मिळणार नाही.

अ‌ॅट्रॉसिटीच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यापूर्वी चौकशी करण्यात यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याच्या अडचणींबरोबर जामीन मिळण्याचा मार्गही मोकळा झाला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने अ‌ॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती केली होती.

केंद्र सरकारने केलेल्या या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. केंद्र सरकारने केलेली दुरुस्ती घटनाबाह्य असल्याचं याचिकाकर्त्याने म्हटलं होतं. मात्र, सरकारने केलेली दुरुस्ती संविधानाच्या चौकटीतच असल्याचा महत्वपूर्ण निर्णय न्यायालयाने दिला आहे.

अ‌ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आल्या होत्या. याची दखल घेत न्यायालयाने काही तरतुदींमध्ये बदल केला होता. मात्र, केंद्र सरकारने या कायद्यात बदल केला होता.

ट्रेंडिंग बातम्या-

आज ती जळाली नाही, समाजाचा व व्यवस्थेचा बुरखा जळाला- चित्रा वाघ

आरोपीला फक्त 10 मिनीट आमच्या ताब्यात द्या; पीडितेच्या मामाची मागणी

महत्वाच्या बातम्या- 

पीडितेचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेवरच संतप्त गावकऱ्यांची दगडफेक

ही घटना आपल्या सगळ्यांनाच मान खाली घालायला लावणारी- नितीन गडकरी

कागदपत्रं मागितली तर छाती दाखवू, मारा गोळी- असदुद्दीन औवेसी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More