Top News

पंढरपुरात 40 अज्ञात मराठा आंदोलकाविरोधात अॅट्रॉसिटी दाखल

पंढरपूर | पंढरपुरमध्ये अज्ञात मराठा आंदोलकांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा आंदोलनावेेळी मागासवर्गीय व्यक्तींच्या दुकानावर दगडफेक आणि समाजपुरूषांच्या प्रतिमेचेही नुकसान झाले होते.

महाराष्ट्र बंद वेळी सत्यवान कांबळे लहूजी वस्ताद चौकात आपले दुकान अर्धवट उघडे ठेवून बसले होते. त्यावेळी 15-20 तरूणांनी तिथे येऊन कांबळेंच्या दुकानावर दगडफेक केली. तेथेच असलेल्या समाजपुरूषांच्या प्रतिमेचेही नुकसान केले. 

दरम्यान, समाजाच्या भावना दुखावल्या असून सार्वजनिक ठिकाणी समाजपुरूषांच्या प्रतिमेची अवहेलना केली आहे, असं सांगत प्रदीप प्रकाश रणदिवे यांनी तक्रार केली आहे. त्यानुसार अज्ञात 40 मराठा आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल केला असून आद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

-आरक्षणात कोणतेही बदल करणार नाही- नरेंद्र मोदी

-…अन्यथा घेराव घालून सहकारमंत्री सुभाष देशमुखांकडून पैसे वसूल करू- राजू शेट्टी

-सरकार संभाजी भिडेंच्या चुकावर पांघरून घालून त्यांना संरक्षण देत आहे- अशोक चव्हाण

-मराठा आंदोलकांनी शांततेला प्राधान्य द्यावं; शरद पवारांनी केलं पत्रकाद्वारे आवाहन!

राज्यकर्ते आणि हितसंबंधी घटक मराठा आंदोलनाला बदनाम करत आहेत- शरद पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या