तृप्ती देसाईंविरोधात पुण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

पुणे | भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या पतीविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. विजय मकासरे यांनी यासंदर्भात तक्रार दिली होती.

२७ जूनला तृप्ती देसाई यांनी त्यांचे पती आणि इतरांसोबत आपल्या लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत गळ्यातील सव्वा तोळे सोन्याची साखळी आणि २७ हजार रुपये काढून घेतले, असा मकासरे यांचा आरोप आहे.

दरम्यान, हिंजवडी पोलिस ठाण्यात तृप्ती देसाई आणि प्रशांत देसाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.