ATS action in pune l पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. मात्र पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक क्राईम घटना घडत आहेत. अशातच आता पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुणे शहरात दहशतवादी विरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एटीएसच्या पथकाचे समाजविरोधी घटकांच्या कारवायांवर बारीक लक्ष होते. अशातच आता पुण्यातील कोंढवा परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकला आहे.
ATS पथकाची मोठी कारवाई :
ATS पथकाने कोंढवा परिसरात छापा टाकला, त्यावेळी त्यांनी बनावट सिम कार्डचे रॅकेट उद्धवस्थ केले आहे. एटीएसच्या छाप्यात तब्बल 3788 सिम कार्ड, वायफाय व सात सिम बॉक्स याशिवाय सिमकार्ड चालवण्याकरता वापरण्यात येणारे अँटिना, लॅपटॉपसह मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
पुण्यात अतिरेक्यांच्या कारवाया यापूर्वी देखील उघड झाल्या होत्या. देशविरोधी तत्वांना विदेशातून येणारे कॉल हे भारतीय गुप्तचर यंत्रणेला समजू न देण्यासाठी हे टेलिफोन एक्सचेंज उभारले गेले असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच पुण्यातील कोंढव्यामध्ये बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटर सुरु असल्याची गोपणीय माहिती एटीएस पथकाला मिळाल्यानंतर ही थेट कारवाई करण्यात आली आहे.
ATS action in pune l दहशतवाद्यांशी काही संबंध आहे का? :
या कारवाईमध्ये नौशाद अहमद सिद्धी या 22 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता त्या तरुणाची कसून चौकशी केली जात आहे. कोंढव्यात असलेल्या मिठानगर येथील एम ए कॉम्प्लेक्स परिसरात हे अनधिकृत एक्सचेंज सेंटर सुरु होते. त्या ठिकाणी तब्बल 3788 सिमकार्ड एटीएस पथकाला मिळाले आहेत.
कोंढव्यात अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. परंतु इतके दिवस त्याची माहिती पोलिसांनी मिळाली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र या घटनेवरून 22 वर्षीय नौशाद अहमद सिद्धी याचा त्या दहशतवाद्यांशी काही संबंध आहे का? या प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे.
News Title : ATS action in pune
महत्त्वाच्या बातम्या-
भाजप नेत्या चित्राताई वाघ ‘या’ मराठी मालिकेत झळकणार; कोणती भूमिका साकारणार?
मधुमेहाच्या रुग्णांनो ‘ही’ गोष्ट करा आणि झटक्यात मधुमेहापासून सुटका मिळवा
बाप्पाच्या आगमनाला 9 दिवस बाकी! ‘या’ 4 गोष्टी चुकूनही विसरू नका!
अजा एकादशीच्या दिवशी ‘हे’ काम करा; विष्णूच्या कृपेने सर्व अडथळे दूर होतील!
प्रतीक्षा संपली! बहुप्रतीक्षित ‘पुष्पा 2’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज