आरोग्य महाराष्ट्र मुंबई

सुधन्वा गोंधळेकरच्या चौकशीमध्ये अजून शस्त्रसाठा जप्त!

मुंबई | एटीएसने केलेल्या कारवाईत पुढील चौकशीत सुधन्वा गोंधळेकर याच्याकडे आणखी शस्त्रसाठा असल्याची माहिती समोर आली. त्याचवेळी एटीएसने विविध जागेवर छापे टाकत अधीक शस्त्रसाठा जप्त केला आहे. 

नव्याने जप्त केलेल्या साठ्यात पथकाला वेगवेगळी 13 प्रकारची हत्यारे सापडली आहेत. त्यात मॅगझीनसह 10 गावठी पिस्तुले, 1 गावठी कट्टा, 1 एअर गन, 10 पिस्टल बॅरल, 6 अर्धवट तयार पिस्टल बॉडी, 6 पिस्टल मॅगझिन, 3 अर्धवट तयार पिस्टल स्लाईड, 16 रिले स्विच, 6 वाहनांच्या नंबर प्लेट्स, 1 ट्रिगर मॅगझिन, 1 चॉपर आणि 1 स्टील चाकू अशी हत्यारे आहेत. 

दरम्यान, गुरूवारी एटीएसने वैभव राऊतच्या घरी शस्त्रसाठा जप्त केला होता. त्यानंतर वैभवसह शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना अटक करण्यात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-आरक्षणात कोणतेही बदल करणार नाही- नरेंद्र मोदी

-…अन्यथा घेराव घालून सहकारमंत्री सुभाष देशमुखांकडून पैसे वसूल करू- राजू शेट्टी

-सरकार संभाजी भिडेंच्या चुकावर पांघरून घालून त्यांना संरक्षण देत आहे- अशोक चव्हाण

-मराठा आंदोलकांनी शांततेला प्राधान्य द्यावं; शरद पवारांनी केलं पत्रकाद्वारे आवाहन!

राज्यकर्ते आणि हितसंबंधी घटक मराठा आंदोलनाला बदनाम करत आहेत- शरद पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या