बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या कटात ‘इतक्या ‘लोकांचा सहभाग, एटीएसला मिळाली मोठी माहिती

मुंबई | देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटक असलेली कार आढळून आली होती. स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करून जाणाऱ्या लोकांचा शोध मुंबई पोलीसांकडून घेतला जात असताना स्फोटक असलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळला होती. आता मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी एटीएसला मोठी माहिती मिळाली आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या कटात जण सहभागी होते, अशी धक्कादायक माहिती ठाणे दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली आहे.

मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या ठिकाणी प्रत्यक्ष चार ते पाच जण उपस्थित होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत फेकला, या ठिकाणी अटक आरोपी विनायक शिंदे स्वतः उपस्थित होता, असंही तपासात समोर आलं आहे. या सर्व कटाचे सूत्रधार अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे असल्याचे ठोस पुरावेही एटीएसला मिळाल्याची माहिती आहे.

हत्येच्या दिवशी म्हणजेच चार मार्च रोजी रात्री मनसुख हिरेन अर्धा तास कुणाशी तरी व्हॉट्सअॅप कॉलवर बोलत होते. हे नंबर अनोळखी होते. हेच सिमकार्ड बुकी नरेश गोर याने उपलब्ध करुन दिले असण्याची शक्यता आहे.

दरम्यान, एटीएसचे DIG शिवदीप लांडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहित मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा झाल्याचा दावा केला आहे. अति संवेदनशील मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. मी आमच्या संपूर्ण ATS पोलीस फोर्समधील सहकाऱ्यांना सॅल्यूट करतो, असं ते म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

“महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकत नाही, उलट केंद्र सरकारच बरखास्त करा”

माही रिटन्स! मैदानावर येताच धोनीनं टोलवला 114 मीटरचा सिक्स; पाहा व्हिडीओ

धक्कादायक! गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ‘या’ महिलेनं केली तक्रार दाखल

महिलेचा मोदींसोबत फोटो छापून आला, वास्तव समोर आल्यावर उडाली खळबळ

मोठी बातमी : 100 कोटी प्रकरणात आता ‘ईडी’ची एन्ट्री?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More