मोठी बातमी! गायक कैलाश खेर यांच्यावर हल्ला

नवी दिल्ली | आपल्या वेगवेगळ्या शैलीतून आणि आवाजातून लोकांच्या मनात घर करणारे एक गायक म्हणजे कैलाश खेर. कैलाश खेर यांच्या एका कार्यक्रमात त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. कर्नाटकातील हंपी या ठिकाणी रविवारी ही घटना घडली.

रविवारी एका गाण्याचा कार्यक्रमात कैलाश खेर यांच्यावर काचेच्या बाटल्या फेकून हल्ला करण्यात आला आहे. कर्नाटकातील हंपी या ठिकाणी हा कार्यक्रम सुरु होता. हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

हंपी उत्सव 2023 या कार्यक्रमात कैलाश खेर गात होते. यावेळी गाणी गात असताना कैलाश खेर यांनी सगळी हिंदी गाणी गायली. कर्नाटकात कार्यक्रमाला येऊन एकही कन्नड गाणं गायलं नसल्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

याच रागातून दोन जणांनी कैलाश खेर यांच्यावर काचेच्या बाटल्या फेकण्यास सुरुवात केली. प्रदीप आणि सुरह अशी हल्ला करणाऱ्यांची नावं आहेत. हल्ला होताच कैलाश खेरच्या टिमने त्यांचा बचाव केला. दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर कैलाश खेर किंवा त्यांच्या टिमकडून कोणतंही भाष्य करण्यात आलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या