बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केवळ दोन रुपयांसाठी अंध भिकाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला; माणुसकीला काळीमा फासणारी घटना

ठाणे | अंबरनाथ रेल्वे स्थानकावर भीक मागणार्‍या एका अंध भिकाऱ्यावर अवघ्या 2 रुपयांसाठी हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी जीआरपीने तात्काळ गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान या घटनेमुळे अंबरनाथ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अंबरनाथमध्ये राहणारी दिलीप मोरे ही अंध व्यक्ती रेल्वे स्थानकावर व परिसरात भीक मागून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. रविवारी संध्याकाळी अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या फलाटावर त्यांनी कॅन्टीन चालकाकडून समोसा विकत घेतला. तो समोसा कॅन्टीन चालकाने त्यांना 10 रुपयाला दिला.

दिलीप मोरे यांनी यावेळी कॅन्टीन चालकाला 8 रुपयांचा समोसा 10 रुपयाला का देता? असे विचारले असता कॅन्टीन चालकाने वाद घालत तीक्ष्ण हत्याराने दिलीप मोरे यांच्यावर थेट हल्ला चढवला. आरोपी कॅन्टीन चालकाचं नाव मंगल सिंह कुशवाहा असं आहे. दरम्यान फक्त 2 रुपयांसाठी या कॅन्टीन चालकाने अंध भिकाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.

दरम्यान, या सगळ्या घटनेमुळे दिलीप मोरे यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. जीआरपीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी या घटनेची दखल घेत कॅन्टीन चालकाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान, अंध व्यक्तीवर अशाप्रकारे शुल्लक कारणाने हल्ला झाल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटतांना पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या

मुंबई-पुण्यातून राज्यातील इतर जिल्ह्यात धावणाऱ्या ‘या’ रेल्वेगाड्या 10 मे पर्यंत रद्द

“देवेंद्र फडणवीस नागपुरात ठाण मांडून बसले म्हणूनच तिथला कोरोना आटोक्यात आला”

दिलासादायक! पुण्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत मोठी घट

“संकट आलं की केंद्राकडे बोट दाखवायचं हीच महाराष्ट्राची ओळख झाली”

परमबीर सिंहांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला; अकोल्यातील पोलीस अधिकाऱ्याचा पत्राद्वारे गौप्यस्फोट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More