Top News देश

दिल्लीतील उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला; मनीष सिसोदियांनी केला व्हिडीओ शेअर

नवी दिल्ली | राजधानी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर काही जणांनी ते घरी नसताना हल्ला केला आहे. त्यासंदर्भातील व्हिडीओ सिसोदिया यांनी त्यांच्या ट्विटर आकाऊंटवरुन पोस्ट केला आहे.

त्या व्हिडीओमध्ये दिसून येतं की, काही अज्ञातांनी मनीष सिसोदिया घरी नसताना त्यांच्या घरात घुसून पत्नी आणि मुलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. हा हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांनीच केला असल्याचा आरोप सिसोदियांनी केला आहे.

तसेच दिल्लीमध्ये भाजपला निवडणूक जिंकता आली नाही म्हणून अशा पद्धतीनं संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे का असा सवाल देखील सिसोदिया यांनी गृहमंत्री अमित शाह यांना विचारला आहे.

त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमुळे सगळीकडे खळबळ उडाली असून भाजपने त्यावर आपली बाजू स्पष्ट करतं सिसोदिया यांनी केलेले सर्व आरोप खोडून काढले आहे. सिसोदिया यांनी शेअर केलेला व्हिडीओ जुना असून हल्ला करणारे भाजपचे कार्यकर्ते नाहीत, असं देखील भाजपचे महामंत्री हर्ष मल्होत्रा यांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

देशातील अॅलोपथी डॉक्टरांचं आज कामबंद आंदोलन

…तर मुंबईत रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत कर्फ्यू-पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल

’31 डिसेंबरपर्यंत तो फलक हटवला नाहीतर…’; तृप्ती देसाईंचा साई संस्थानला इशारा

तुम्ही UPA चं नेतृत्व करणार का?, शरद पवार म्हणतात…

गायिका कार्तिकी गायकवाडचं शुभमंगल सावधान; पाहा लग्नातील निवडक फोटो

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या