“देवेंद्र फडणवीस येतील असं वाटलं होत पण अर्धवट येतील असं वाटलं नव्हतं”
मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद( CM) आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं हा खराच एक भूकंप आहे. फडणवीस येतील असं वाटलं होतं पण अर्धवट येतील असं वाटलं नव्हतं. ज्यांनी राज्यात नवीन राज्य आणलं आहे ते सुखाने नांदोत. शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळालं आणि फडणवीसांच्या आयुष्यात भूकंप झाला, असाही टोला लगावला.
छत्रपती सांगतात, शत्रूची फौज कधीच मोजू नका. आपल्यातील फितूर किती ते मोजा! आणि हे खर ठरलं. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देताना सांगितलं माझ्याच लोकांनी दगा दिला. काहींनी आधी राज्यसभेचा उमेदवार पाडला आणि विधानपरिषदेतही पाचवा उमेदवार विजयी केला. हे सरकार कोसळलं ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमुळे नाही तर आपल्याच लोकांमुळे, असंही नमूद केलं आहे.
जे आमदार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मोठं झालं त्यांनीच त्यांच्याविरोधात बंड केलं. किमान 16 आमदार ईडीच्या भितीने पळाले. जे कोण म्हणतं आहे मविआ सरकार अनैसर्गिक आहे. त्याहून जास्त अनैसर्गिक आलेलं सरकार आहे. दीपक केसरकर सांगतात, महाराष्ट्रात जे घडलं त्यास संजय राऊत जबाबदार आहेत? शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला हा काय गुन्हा झाला?, असा प्रश्नही सामनातून राऊतांनी विचारला आहे.
थोडक्यात बातम्या
“वडिलकीचा सल्ला देतो, देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्वप्नात देखील विश्वास ठेवू नका”
शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
राज्यातील ‘या’ भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज
“तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा हक्काने मला आदेश देत जा”
बंडखोर आमदारांबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
Comments are closed.