बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ममता बॅनर्जींवरील हल्ल्याला वेगळं वळण; प्रत्यक्षदर्शीनं केला ‘हा’ मोठा खुलासा

कोलकाता | पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचं रण चांगलंच पेटलं आहे. 8 टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा 27 मार्चला सुरू होईल तसेच 29 एप्रिलला या मतदानाचा शेवट होणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी नंदिग्राममध्ये चार ते पाच लोकांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे.

नंदिग्रामच्या बिरूलीयामध्ये निवडणूक प्रचारादरम्यान आपल्यावर हल्ला झाला असल्याचं ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान या घटनेनंतर ममता यांना कोलकाताच्या एसकेएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे आणि पाय फ्रॅक्चर असल्याचं ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी माध्यमांना सांगितलं. या प्रकरणाची दखल घेत निवडणूक आयोगाने एक अहवालही मागवला आहे.

या सर्व प्रकरणात प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी मात्र वेगळा खुलासा केला आहे. ममता बॅनर्जी या सभेसाठी आल्या आणि त्यांना पाहण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी झाली होती. सभा संपल्यानंतर ममता या परत निघाल्यानंतर गर्दीमध्ये काही लोक पडले. त्या वेळेला गाडी अतिशय हळु चालत होती आणि गाडी जवळ त्यावेळी कोणीही उपस्थित नव्हते तसेच कोणी त्यांना धक्काबुक्की केली नाही असं सुमन मैती या प्रत्यक्षदर्शी तरुणाने माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

दुसऱ्या प्रत्यक्षदर्शी चित्रंजन दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, सभा संपल्यानंतर ममता बॅनर्जी गाडीत बसलेल्या होत्या पण गाडीचा दरवाजा उघडा असल्यामुळे एका पोस्टरचा गाडीच्या दाराला फटका बसला आणि दार बंद झालं. त्यामुळे कदाचित ममता यांना दुखापत झाली असू शकते. तसेच या सर्व प्रकरणात मी स्वतः पाहिलं की गाडी जवळ कोणीही नव्हतं आणि कोणत्याही व्यक्तीने गाडीचा दरवाजा बंद केला नाही असं ही प्रत्यक्षदर्शी दास यांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या

आता लग्नाला फक्त 20 लोकांनाच परवानगी; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात अत्यंत कडक निर्बंध लागू!

महाराष्ट्रातील ‘या’ प्रमुख धार्मिक ठिकाणी संचारबंदी; गुलाल उधळणे, पेढे वाटण्यास सक्त मनाई

शरद पवार-विश्वास नांगरे पाटलांच्या भेटीनं चर्चांना उधाण; ‘या’ विषयावर झाली चर्चा?

ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढली, महाविकास आघाडीतील ‘या’ बड्या नेत्यानं पुन्हा दिला इशारा

ममता बॅनर्जींच्या पायाला गंभीर दुखापत; तर प्रशांत किशोर सोशल मीडियात ट्रेंडमध्ये

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More