बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आमदाराच्या भावाच्या कार्यालयावर मोठा हल्ला, पुण्यातील घटनेनं मोठी खळबळ

पुणे | पिंपरी-चिंचवडमधील भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भावाच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये एकच खळबळ माजली आहे. साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच आमदार लक्ष्मण जगतापांचे बंधू शंकर जगताप यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. शंकर जगताप हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्या चंद्ररंग या कार्यालयाच्या दिशेने अज्ञात हल्लेखोरांनी राॅकेल बाॅम्ब टाकून पळ काढला. हि सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हे बाॅम्ब जवळच्याच रोहीत्रावर पडल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. तसेच तात्काळ पोलिसांचं एक पथक आरोपींना शोधण्यासाठी रवाना झालं आणि त्यांनी 4 हल्लेखोरांना सीसीटीव्हीच्या आधारावर अटक कऱण्यात आली आहे. त्यापैकी 2 जण सज्ञान असून 2 जण अल्पवयीन असल्याचं स्पष्ट झालं आहे.

सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 4 जणांपैकी 1 जण मुळचा सांगवीचा राहणार असून उर्वरित आरोपी कासारवाडी व पिंपळे गुरव येथील राहणारे आहेत. हा हल्ला नेमका का केला?, हे अद्याप स्पष्ट झालेलं नसून आमदाराच्या भावाच्या कार्यालयावर हल्ला झाल्याने यात काही राजकीय हेतू होता का?, याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

थोडक्यात बातम्या

पहिली ते सातवीच्या शाळांचीही घंटा वाजणार?, टास्क फोर्सने दिली ‘ही’ महत्वाची माहिती

आता विद्यार्थ्यांना महानगरपालिका देणार 51 हजार रुपये, वाचा सविस्तर

राष्ट्रवादीत मोठी खळबळ! ‘या’ आमदारानी दिला पदाचा राजीनामा

आर्यन खान प्रकरणात पंच असलेल्या ‘या’ व्यक्तीला अटक

काय सांगता! आता चक्क रेल्वेच मिळणार भाड्याने; रेल्वे मंत्रालयाने जाहीर केली ‘ही’ नवी योजना

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More