गोवंडीत पोलिसांची डोकी फोडली, 11 पोलीस जखमी

संग्रहीत फोटो

मुंबई | महाराष्ट्र बंदच्या दिवशी बंदोबस्तास असलेल्या पोलिसांना मोठा त्रास सहन करावा लागला. गोवंडी पोलीस ठाण्यातील 11 पोलीस जखमी झालेत. 

महाराष्ट्र बंद वेळी गोवंडीत बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांवरच हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अनेक पोलिसांच्या डोक्याला मार लागला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

गोवंडी पोलीस ठाण्यातील पोलिसांवर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवली आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हेगारांना शोधण्याचं काम सुरु आहे.