बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पोलिसाला जबर मारहाण!

नांदेड | कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने आज वीकेंड लॉकडाऊन सुरू केलाय. या दरम्यान नागरिकांनी बाहेर फिरू नये असे आवाहन करण्यात आलंय. तर विनाकारण व विना मास्क बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे.

नांदेडमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने विना’मास्क फिरणाऱ्या दुचाकी चालकांविरूद्ध कारवाई करत दंड ठोठावला असताना दुचाकी चालकाने दगड फेकून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

प्रभाकर निवृत्तीराव कच्छवे असं जखमी पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.गंभीर जखमी अवस्थेतील नाईक पो.कॉ. प्रभाकर कच्छवे यांच्यावर नांदेड येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असून आरोपी दुचाकी चालकास पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील परभणी जिल्ह्यातील चूडावा येथे आज सकाळी विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलीसांची कारवाई सुरु होती. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन सैदाणे व त्यांचे सहकारी पोलिस कर्मचारी वसमत फाटा परिसरात नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत होते. त्यांनी कोरोनानियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि विनामास्क फिरणाऱ्या दुचाकीचालकांवर कारवाई सुरु केली. त्याचवेळी, चुडावा येथील रहिवासी असलेला एका दुचाकीस्वार विनामास्क तेथून जात होता. त्यास पोलिसांनी कारवाईसाठी थांबविण्याचा प्रयत्न केला यावेळी त्याने पोलिसावरच हल्ला केला.

थोडक्यात बातम्या – 

“त्यांच्या जिवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला उदयनराजेच जबाबदार असतील”

दिल्ली कॅपिटल्सची विजयी सलामी; पृथ्वी- शिखरच्या जोडीपुढे चेन्नईचे गोलंदाज फेल

…म्हणून पुण्यातील लेडी डॉनला आला राग, स्वतःच्याच प्रियकराची केली हत्या

पुणे शहरातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी

अमित मिश्राने सांगितला तो ‘मंत्र’ आणि दिल्ली कॅपिटल्सला भेटली महत्वाची विकेट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More