बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उत्तर प्रदेशच्या जमावाकडून पुणे पोलिसांच्या पथकावर हल्ला; गाडीची तोडफोड

लखनऊ | उत्तर प्रदेश आणि बिहार ही दोन राज्य कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत नेहमी ढिम्मी असतात. या राज्यात गेल्या दशकभरात सामान्य नागरिक सोडाच पण पोलीस देखील घाबरून राहत होते. आता कायद्याचे तीनतेरा वाजलेल्या राज्यात पुणे पोलिसांवर हल्ला झाला आहे. पुणे पोलिसांच्या पथकावर उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील फरासखाना पोलिस स्टेशनमधील एका कॉन्स्टेबलची भर रस्त्यात हत्या झाली होती. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी लगेच तपास सुरु केला होता. यात एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश देखील आलं होतं. पण याच दिवशी एक महिला उत्तर प्रदेशला फरार झाली होती. याच्या तपासासाठी सहा पोलिसांचं पथक इनोव्हा प्रायव्हेट कार घेऊन गाझियाबादमध्ये गेलं होतं.

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये त्या महिलेसंबंधी माहिती काढण्याचा पोलिस प्रयत्न करत होते. पण त्याचवेळी परिसरातील काही लोक तेथे जमले आणि त्यांनी पुणे पोलिसांवर हल्ला केला. या पोलिसांच्या पथकाला मारहाण करत त्यांच्या गाडीची देखील तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांनी गाझियाबाद स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. या हल्ल्याचं कारण अद्याप समजू शकलं नाही.

दरम्यान, गाझियाबाद पोलिसांच्या मदतीने पुणे पोलिसांनी कडक तपास करत संबंधित आरोपी महिलेला ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर, आरोपी महिलेला घेऊन पोलिस महाराष्ट्राकडे रवाना झाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

खुशखबर! 2 ते 18 वर्षांच्या मुलांनाही आता मिळणार कोरोनाची ‘ही’ लस

कोरोना रूग्णाला एका दिवसात बरं करण्याचा दावा करणाऱ्या डाॅक्टराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कोरोनामुक्तीच्या वाटेवर असलेल्या ‘या’ जिल्ह्याच्या पॅटर्नची चर्चा संपुर्ण राज्यभरात सुरू

‘अजितदादा मराठ्यांचा घात करू नका’; मराठा आरक्षणाबाबत संभाजी ब्रिगेड आक्रमक

‘या’ शहरात पसरलेल्या अफवेमुळे पेट्रोल पंपाचा साठा चक्क एका दिवसात पुर्णपणे संपला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More