बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ज्या ठिकाणी हल्ला झाला त्याच ठिकाणी…’; उदय सामंतांंचा विरोधकांना थेट इशारा

रत्नागिरी | शिंदे गटाच्या बंडाळीनंतर राज्यातील राजकारणात बरीच उलथापालथ पाहायला मिळाली. त्यामुळे राज्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. बंडखोर आमदारांना गद्दार बोलून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली हेोती. तर पुण्यातील कात्रज परिसरात विरोधकांकडून शिंदे गटाचे आमदार, मंत्री उदय सामंत ((Uday Samant) यांच्या गाडीची काचही फोडली गेली.

दोन्ही गटात संघर्ष पेटलेला असतानाच सामंतांनी विरोधकांना मोठा इशारा दिला आहे. सामंत यांनी गाडीवर झालेल्या हल्ल्याबाबत कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली होती. पण त्यांनी आता पुन्हा या हल्ल्याची आठवण करून देत विरोधकांना आव्हान दिले आहे.

सामंत म्हणाले, ज्या ठिकाणी माझ्यावर हल्ला झाला त्याच ठिकाणी पुढच्या 15 दिवसांत एकटा जाऊन मी सभा घेणार आहे. कोणामध्ये किती दम आहे, त्यांनी माझ्या केसाला धक्का लावून दाखवावा, असंही त्यांनी म्हटलं. या कार्यक्रमात सामंत यांनी विरोधक आणि खासदार विनायक राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवल्याचं पाहायला मिळालं.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More