शरद पवारांकडून जितेंद्र आव्हाडांची समजूत काढण्याचा प्रयत्न; आव्हाड गृहनिर्माण मंत्रिपद सोडण्यास अनुत्सुक
मुंबई | कृषीमंत्रीपद किंवा गृहनिर्माण मंत्रिपद खडसेंना देणार अशी चर्चा आहे. खडसे यांच्याकडे कृषीमंत्रिपद सोपवलं जाणार, असे यापूर्वी सांगितले जात होते. मात्र, शिवसेना कृषीमंत्रिपद सोडायला तयार नाही, अशी माहिती माहिती आहे.
एकनाथ खडसे यांना जितेंद्र आव्हाडांचं गृहनिर्माण खातं देणार असल्याची चर्चा असताना सध्या शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात चर्चा सुरू आहे.
जितेंद्र आव्हाड यांची पवारांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. आव्हाडांकडे गृहनिर्माण खातं आहे. ते आपलं खातं देण्यासाठी तयार नसून यासंबंधी चर्चा करण्यासाठी ते शरद पवारांकडे गेल्याचं कळतंय.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्वाधिकार आहेत. ते जो निर्णय घेतील, जो आदेश देतील त्याचं पालन करणं हे शिवसैनिकाचं काम आहे, असं दादा भूसे म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
पुण्यातील बेपत्ता व्यावसायिक गौतम पाषाणकर यांची सुसाईड नोट सापडल्याने खळबळ!
उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा; अतिवृष्टीग्रस्तांसाठी ‘इतक्या’ हजार कोटींचं पॅकेज जाहीर
दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका; दिल्लीतील रुग्णालयात दाखल
‘भारत विषारी वायू सोडणारा देश’; डोनाल्ड ट्रम्प यांची भारतावर टीका
Comments are closed.