बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मंत्रालयासमोर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न!

मुंबई | देशाच्या 75व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं देशभर ध्वजारोहण केलं जात आहे. संपूर्ण देशवासी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयातील प्रांगणात ध्वजारोहण पार पडलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेला कोरोनाविषयी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. अशातच ध्वजारोहन करताना मंत्रालयाच्या प्रांगणात एक धक्कादायक प्रकार घडल्याची बातमी समोर येत आहे.

ध्वजारोहन पार पडत असताना मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल टाकत शेतकऱ्यानं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब घडली आहे. या शेतकऱ्यानं असं का केलं? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. 

जळगाव जिल्ह्यातील शेतकरी सुनील गुजर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. अंगावर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा या शेतकऱ्यानं प्रयत्न केला होता मात्र तिथे उपस्थित नागरिक, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं पुढील अनर्थ टळला.

दरम्यान, मंत्रालयाच्या समोर पोलिस बंदोबस्त असताना देखील एका शेतकऱ्यांनं स्वत:ला आग लावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ माजली आहे.

थोडक्यात बातम्या –

…नाहीतर पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल- उद्धव ठाकरे

सबका साथ, सबका विकास, आता ‘सबका प्रयास’ करावा लागणार – नरेंद्र मोदी

मुंडे साहेबांच्या आशिर्वादामुळे मी आज इथवर पोहोचलो- भागवत कराड

लोकशाहीचा सुवर्णकाळ संपलाय आणि सर्वकाही अधोगतीस लागलं आहे- संजय राऊत

…म्हणून सहकार मंत्रालय स्थापन केलं- नरेंद्र मोदी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More