बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न

नवी दिल्ली | गेल्या वर्षी कोरोना काळातच चर्चेत आलेल्या ‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांना तातडीनं दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सव्वा 11 वाजण्याच्या सुमारास 80 वर्षीय कांता प्रसाद सफदरजंग रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळाली. कांता प्रसाद यांनी मद्य तसंच झोपेच्या गोळ्या एकत्र घेतलं होतं. त्यांच्या मुलानेही जबाबात हीच माहिती दिली आहे. रुग्णालयाने आपल्या रिपोर्टमध्ये ते बेशुद्ध असल्याचं म्हटलं आहे. पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत.

कांता प्रसाद यांचा युट्युबर गौरव वासन याची माफी मागत पाया पडत असल्याचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. गौरवने गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये कांता प्रसाद यांना कसं कष्टप्रद जीवन जगावं लागत आहे, याची कहाणी जगासमोर आणली होती. यानंतर कांता प्रसाद एका रात्रीत प्रसिद्ध झाले होते.

दरम्यान, सोशल मीडियावर गेल्या वर्षी दिल्लीच्या मालवीय नगरमधील ‘बाबा का ढाबा’ चांगलाच चर्चेत आला होता. बाबा का ढाबा चालवणाऱ्या 80 वर्षीय कांता प्रसाद आणि त्यांची पत्नी बादामी देवी यांचं नशीब एक व्हायरल व्हिडीओमुळे एकदम पलटून गेलं होतं. लोक मदतीसाठी पुढे येऊ लागले होते. त्यानंतर अनेकांनी त्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली होती. त्यानंतर त्यांनी एक रेस्टॉरंटदेखील सुरु केलं होतं. मात्र, आता पून्हा लाॅकडाऊनमुळं हे रेस्टॉरंट त्यांना बंद करावं लागलं.

 

थोडक्यात बातम्या – 

ज्याची भीती होती तेच झालं! भारत-न्युझीलंड अंतिम सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाचा खोळंबा

राष्ट्रवादी-शिवसेना युतीबाबत संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

“शिवसेना भवनासमोर जो राडा झाला त्याचं उत्तर भाजपला दिलं जाईल”

बीजेपीची बिघडलेली छत्री काँग्रेसच्या छत्री दुरूस्ती केंद्रावर; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

“नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळत असल्यास माझ्या शुभेच्छा आहेत, पण…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More