Top News

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्याचा प्रयत्न!

वॉशिंग्टन | व्हाईट हाऊस येथे डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचं एक पार्सल पोहोचलं. या पार्सलमध्ये एक विषारी वस्तू सापडल्याचं कळतंय. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचं षडयंत्र रचलं जात असल्याचा संशय आहे.

रिसिन नावाचं विष होतं. व्हाईट हाऊसमध्ये जे कुठलं पार्सल किंवा पत्र येतं ते डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी तपासलं जातं. हे पार्सल कॅनडा येथून आल्याचा संशय आहे. या आठवड्यातच हे पार्सल पाठवण्यात आलं होतं. हे पार्सल डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने आलं होतं.

सध्या फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि सीक्रेट सर्विस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हे पार्सल कोणी आणि कुठून पाठवलं याचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, रिसिन हा एक विषारी पदार्थ आहे, जो एरंडेलच्या बियांमधून निघतो. याचा वापर दहशतवादी हल्ल्यांसाठी केला जात असल्याचं बोललं जातंय.

महत्वाच्या बातम्या-

पुढच्या 24 तासांत राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

‘पोलिस अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता’; अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट

“मराठा आरक्षणावरुन भाजपने राजकारण न करता साथ दिली पाहिजे”

“उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांचं निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासा”

आरएसएसच्या मुख्यालयातील 9 स्वयंसेवकांना कोरोनाची लागण!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या