Top News राजकारण

मुंबईला दिल्लीचं पायपुसणं करण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा भाजपवर आरोप

File Photo

मुंबई | मुंबई महानगरपालिकेवर भाजपाचाच भगवा फडकणार असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. या वक्तव्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

“मुंबईतील उद्योगांमध्ये, आर्थिक उलाढाली तसंच जमिनींमध्ये रस असल्यामुळे भाजपाला मुंबई महापालिकेत रस आहे. गेल्या 50 वर्षांपासून हे सुरूये. त्यांना मुंबईला दिल्लीचं गुलाम, पायपुसणं करायचंय. त्यांना मुंबई विकायची आहे, घशात घालायची आहे. मात्र मुंबई ओरबाडण्याला आमचा विरोध असल्याचं,” संजय राऊत यांनी म्हटलंय.

मुंबई महानगरपालिकेवर जो भगवा फडतोय त्याला हात लावायची किंवा खाली उतरवण्याचीही हिंमत करणाऱ्यांचे हात जळून खाक होतील, असंही राऊत म्हणालेत.

संजय राऊत पुढे म्हणाले, “भाजपला वाटतंय जो छत्रपतींचा भगवा फडकत आहे तो शुद्ध नाहीये. मात्र आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच भगवा आहे. आणि गेली 50 वर्ष तो मुंबई महानगरपालिकेवर फडकतोय.”

महत्वाच्या बातम्या-

ममता बॅनर्जींचं पंतप्रधान मोदींना पत्र; ‘ही’ केली मागणी

कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढतेय; पुणेकरांना काळजी घेण्याचं आवाहन

“शिवसेनेने गेल्या अनेक वर्षात मुंबईचं वाटोळं करण्याचं पाप केलंय”

वीजबिलांवरून राज्य सरकारने जनतेचा विश्वासघात केलाय- देवेंद्र फडणवीस

वीज बिलांवरुन नितेश राणेंची ठाकरे सरकारवर खोचक टीका, म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या