बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धावत्या रिक्षात महिलेवर बलात्काराचा प्रयत्न; रिक्षा न थांबवल्यानं महिलेनं उचललं धक्कादायक पाऊल

मुंबई | मुंबई मधील अंधेरी येथून मलाडला जाणाऱ्या एक्सप्रेस हायवेवर अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या रिक्षामध्ये रिक्षाचालकाने त्याच्या मित्राच्या साह्याने महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आहे. यादरम्यान आपली सुटका करुन घेण्यासाठी महिलेने धक्कादायक पाऊल उचलल्यामुळे तिला मोठ्या प्रमाणत दुखापत झाली आहे.

संबंधित महिला रात्री पावणे एकच्या सुमारास मलाडला जाण्यासाठी रिक्षात बसली. रिक्षा चालकाचा मित्र महिलेच्या आधीच त्या रिक्षात बसलेला होता. रिक्षा काही अंतरावर पुढे गेल्यानंतर रिक्षामध्ये बसलेल्या माणसाने महिलेला स्पर्श करण्यास सुरूवात केली. रिक्षात बसलेल्या रिक्षा चालकाच्या मित्राने रिक्षाचा वेग वाढवण्यास सांगितला. रिक्षा थांबत नसल्याने आपला बचाव करण्यासाठी महिलेने अखेर वेगाने चालत असलेल्या रिक्षातून उडी मारली.

रिक्षातून उडी मारल्यानंतर रिक्षा चालक आणि त्याचा मित्र दोघेहे तेथून फरार झाले. मात्र रिक्षातून उडी मारल्यामुळे महिलेच्या हाताला आणि डोक्याला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे. त्यानंतर महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. तसेच दोन्ही आरोपींची स्केच काढण्यात आले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असून दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, महिलेने धावत्या रिक्षातून उडी मारल्यामुळे तिच्यावर होणारा अत्याचार टळाला आहे. मात्र उडी मारल्यामुळे महिला प्रचंड जखमी झाली आहे. तसेच दोन्ही आरोपींवर व्यवस्थित कारवाई करण्यात येईल.

थोडक्यात बातम्या-

जगप्रसिद्ध TESLA भारतात कार विकायला सज्ज, पहिल्यांदा ‘या’ तीन शहरांमध्ये गाड्या मिळणार

चेन्नईच्या संघासोबत खेळायची संधी सांगून तरुणाची मोठी फसवणूक, प्रकरण पोलिसात

…तर सीरमची एकही गाडी महाराष्ट्रबाहेर जाऊ देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा

कोरोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबिजची लस, ‘या’ ठिकाणच्या घटनेमुळं एकच खळबळ

अखेर पुण्यावर केंद्राची कृपादृष्टी, कोरोना लसीचे 3 लाख 73 हजार डोस मिळणार

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More