बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ शिवसेना आमदाराची गाडी त्यांच्याच घरासमोर पेटवण्याचा प्रयत्न

बुलडाणा | गेल्या काही दिवसांपासुन आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारे शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांची ईनोव्हा गाडी त्यांच्याच राहत्या घरी पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मंगळवारी मध्यरात्री हा प्रकार घडला असुन सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही. मंगळवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास गायकवाड हे मुंबईहुन आपल्या घरी बुलडाण्याला परत आले होते.

दरम्यान, मंगळवारी रात्री 3 वाजण्याच्या सुमारास 2 अज्ञात व्यक्ती दुचाकीवर आले आणि त्यांनी गायकवाड यांच्या गाडीवर पेट्रोेल ओतुन गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला.  यावेळी त्यांनी परिसरातील विद्युत पुरवठाही खंडीत केला होता. काही दिवसांपासुन आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संजय गायकवाड हे चर्चेचा केंद्रबिंदु ठरले होते.

संजय गायकवाड यांनी या घटनेसंदर्भात महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संपर्क केला असून बुलडाण्याचे पोलिस अधिक्षक यांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतलं आहे. आरोपींचा शोध पोलिसांतर्फे केला जात आहे.

आज सकाळी बुलडाण्यातील स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आमदार संजय गायकवाड यांच्या घरी दाखल झालं आणि तपासाला सुरूवात झाल्याचं पाहायला मिळालं. यासंबंधी राजकीय द्वेषातुन हा हल्ला झालेला असू शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. एका आमदाराची गाडी त्यांच्याच घरासमोर पेटवण्याचा प्रयत्न झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

थोडक्यात बातम्या – 

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात रोमांचक सामन्यावर राजस्थान राॅयलचं मजेशीर ट्विट

‘देवा, घड्याळाचे काटे पुन्हा उलटे फिरव…’; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेशची भावूक पोस्ट

‘रूग्ण तडफडेल, तरी तुम्हाला अॅम्ब्युलन्स मिळणार नाही’; अॅम्ब्युलन्स मालकाची अरेरावी

कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या पदाधिकाऱ्यांचे राज ठाकरेंकडून सांत्वन, म्हणाले…

पत्रकाराच्या प्रश्नावर नारायण राणे म्हणाले,’कोण संभाजीराजे?’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More