Top News क्राईम विदेश

मंत्र्याकडून संसदेतच बलात्काराचा प्रयत्न, महिलेच्या आरोपानं एकच खळबळ

Photo Courtesy- Pixabay

लंडन | युकेमधील कंजर्वेटीव पार्टीच्या सरकारमधील मंत्री टाॅप टोरीवर लंडनमधील एका महिलेवर संसदेत हल्ला करून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी गंभीरतेने लक्ष न दिल्याचा आरोप देखील महिलेने केला आहे. पोलिसांनी जानेवारी 2021 मध्ये या केसची फाईल बंद केली होती. मात्र महिलेने परत आवाज उठवल्यामुळे ही घटना चर्चेत आली आहे.

टाॅप टोरी या मंत्र्याने महिलेवर संसदेत हल्ला केला असून तिच्या हातावर काही जखमा आहेत. या घटनेची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दुर्लक्ष करुन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महिलेने पोलिसांवर केला आहे. मात्र आरोपी मंत्री टाॅप टोरीला त्याच्या गुन्हाची शिक्षा मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही, असं महिलेने सांगितलं आहे.

पीडितेवर हल्ला केल्यानंतर तिला धक्का बसला होता. घटनेची तक्रार नोंदवल्यानंतर, असं करणं तिला खूप महागात पडेल अशी धमकी मंत्र्याने दिली असल्याचं महिेलेने सांगितलं आहे. पीडितेच्या आईने सांगितलेल्या माहितीनुसार, पोलिस केस मागं घेण्यास सांगत असून मंत्र्याविरुद्ध अजून कोणताही पुरावा सापडलेला नाही.

दरम्यान, आरोपी मंत्री टाॅप टोरीवर लावलेले आरोप खोटे असून त्यांच्या विरुद्ध षडयंत्र रचण्यात आलं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र महिलेला या घटनेच्या एक दिवस आधी धमकी मिळाली असल्याचं तिच्या मैत्रीणिने सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे ‘या’ आमदाराला येत आहेत धमक्यांचे फोन!

डीजीपींनी नोकरी सोडत घेतला शेती करण्याचा निर्णय

आता मनसेच्या अमित ठाकरेंचीही शिवसेनेवर टीका, म्हणाले…

ज्युनिअर तेंडुलकरवर ‘हे’ तीन संघ लावणार बोली?

आई-वडिल घरात नसताना पाच वर्षाच्या चिमुरडीसोबत नराधमाने केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या