बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आंबिल ओढा परिसरातील नागरिक आणि पोलीसांमध्ये तुफान राडा; नागरिकांकडून आत्मदहनाचा प्रयत्न

पुणे | पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान स्थानिक आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आले आहेत. या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला आहे.

बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आहे. त्यासाठी जबरदस्तीने आंबिल ओढ्यात असलेली घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी पोलिस आणि स्थानिकांमध्ये झटापट झाल्याचं पाहायला मिळाले. यावेळी स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत मोठी गर्दी केली.

मी पुण्याचा माजी महापौर आहे, महापौर जे निर्णय घेतात, ते प्रशासन ऐकतं, त्यामुळे राज्य सरकार किंवा प्रशासनाला दोष न देता, भाजपने हात झटकू नये, आम्ही प्रशासन चालवलं आहे, सत्ताधाऱ्यांना विचारात घेतल्याशिवाय प्रशासनन कारवाई करत नाही, असा दावा राष्ट्रवादीचे पुणे अध्यक्ष आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांनी केलाय.

ही कारवाई का केली असा प्रश्न प्रशासनाला विचारण्यात आला, पण त्यांच्याकडे उत्तर नाही. त्यामागचं कारण शोधावं लागेल. जर सत्ताधारी भाजपने पावसाळ्यात कारवाई करु नये असं ठरवलं होतं, तरीही ही कारवाई का झाली, राज्य सरकारशी चर्चा करुन प्रशासनावर कारवाई करण्याबाबत विचारणा करु, असं भाजप आमदार आणि माजी महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या- 

“महाविकास आघाडी सरकार हे शिवशाही सरकार नसून बेबंदशाही सरकार”

“सचिन वाझेच्या पुनर्नियुक्तीशी अनिल देशमुख यांचा थेट संबंध नाही”

‘इंधन दरवाढीसाठी काँग्रेस जबाबदार’; पेट्रोलियम मंत्र्यांचा गंभीर आरोप

कडक सॅल्युट! बोट तुटलं तरीही ‘तो’ सामना खेळायला मैदानात उतरला

ओबीसी आरक्षण रद्द होण्यास भाजप सरकार जबाबदार – नाना पटोले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More