मुंबई | मुंबईमध्ये मंत्रालयासमोर एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. एका व्यक्तीनं आपल्या कुटुंबासह मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे सध्या एकच खळबळ उडाली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील माळवटा गावातील राजू चन्नापा हुनगुंडे यांनी आपल्या कुटुंबासह अंगावर राॅकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. हुनगुंडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर आक्षेप घेतला होता. बांधकाम विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून त्रास होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
नांदेडमध्ये जवळपास साडे आठ किलोमीटरच्या रस्त्याचे काम करण्यात आले. ज्याची किमंत 1 कोटी 70 लाख रुपये आहे. त्यापैकी केवळ 14 लाख रुपये देण्यात आले आहेत. उरलेले पैसै मागितले म्हणून मला आणि माझ्या कुटुंबाला मारहाण करण्यात आली असा आरोप हुनगुंडे यांनी केला.
दरम्यान, पोलिसांनी वेळीच राजू हुनगुंडे यांना रोखले त्यामुळे कोणताही अनर्थ होण्यापासून टळला आहे. आता यावर ठाकरे सरकार काय पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या –
Gold Rate: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी वाढ, वाचा ताजे दर
सोनाली कुलकर्णी पुन्हा अडकली लग्नबंधनात, फोटो शेअर करत म्हणाली…
उत्तर कोरियात दोन वर्षांनी कोरोना रूग्ण आढळताच किम जोंगने उचललं ‘हे’ मोठं पाऊल
मोठी बातमी! संभाजीराजेंकडून ‘स्वराज्य’ संघटनेची घोषणा
“माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जा”; राष्ट्रवादीचा भाजपला इशारा
Comments are closed.