विधानसभेपूर्वीच अजितदादांना धक्का?, ‘या’ आमदाराने घेतली शरद पवारांची भेट

Atul Benke | लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा फटका बसला. त्यांना एकाच जागेवर विजय मिळवता आहे. लोकसभेनंतर आता राज्यात लवकरच विधान सभेच्या निवडणुका होतील. महायुतीसह महाविकास आघाडी विधानसभेसाठी चाचपाणी करत आहे. त्यातच लोकसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटात महायुतीला धक्क्यावर धक्के देत आहे.

गेल्या महिनाभरात अनेक नेत्यांनी महायुतीची साथ सोडत शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलाय. अशात अजित पवार (Ajit Pawar) यांना एक मोठा धक्का बसण्याची सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांनी आज (20 जुलै) सकाळी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता अतुल बेनके हे अजित पवारांची (Ajit Pawar) साथ सोडणार आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार का?, अशा चर्चा सुरू आहेत.

अमोल कोल्हेंच्या घरी अतुल बेनके-शरद पवारांची भेट

शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या घरी ही भेट घडली आहे. या भेटीबाबत शरद पवारांनी ही दुजोरा दिलेला आहे. ते आत्ता कोणत्या पक्षात आहेत? ते अजित पवार गटात आहेत, याची मला कल्पना नाही. तो माझ्या मित्राचा मुलगा आहे, त्यामुळं यावर फार चर्चा नको, असं शरद पवार म्हणाले आहेत.

शरद पवार यांनी या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवारांना माध्यम प्रतिनिधींनी अतुल बेनके (Atul Benke) तुमच्या पक्षात येणार का? ते तुमच्या भेटीसाठी का आले होते?, असे अनेक सवाल केले. यावर त्यांनी म्हटलं की, आमच्यात काहीही चर्चा झालेली नाही. लोक भेटायला येत असतात. अतुल बेनके यांचे वडील माझे मित्र होते. आमच्या मित्राचा तो मुलगा आहे. यामध्ये काही राजकारण होत असेल तर त्यावेळेला त्याचा निकाल देऊ.

आमदार अतुल बेनके यांच्याकडून पक्षप्रवेशाचे संकेत

तसंच, लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी काम केले ते आमचे. त्यांच्या हिताची जपणूक ही आमची जबाबदारी आहे, असे सूचक वक्तव्य देखील शरद पवार यांनी केलं आहे. त्यामुळे अतुल बेनके यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चा अजूनच वाढल्या आहेत. इतकंच नाही तर, स्वतः अतुल बेनके (Atul Benke) यांनी देखील या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात काहीही घडू शकतं, अगदी शरद पवार आणि अजित पवार  ही एकत्र येऊ शकतात, असं आमदार अतुल बेनके म्हणाले आहेत. एक प्रकारे त्यांनी पक्ष प्रवेशाबाबत संकेतच दिले आहेत.

News Title :  Atul Benke met Sharad Pawar

महत्त्वाच्या बातम्या-

गुड न्यूज! सोनं तब्बल ‘इतक्या’ हजारांनी घसरलं, चांदीचाही मोठा दिलासा

शनीदेवाच्या कुपेने ‘या’ 3 राशींना मोठा धनलाभ होणार!

विदर्भात पावसाचं थैमान! ‘या’ भागांतील शाळांना सुट्टी जाहीर

पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!

‘आता लाडक्या नातवाचं बघा’; मनसे नेत्याने मुख्यमंत्र्यांना सुनावलं