बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मेंदूला संसर्ग होण्यासाठी काँग्रेस नेता असणं पुरेसं असतं”

मुंबई | कोरोनाच्या महामारीत राजकारण करू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस नेते मोदी सरकारवर कडाडून टीका करताना दिसत आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा जाणवत आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. याला आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी नाना पटोलेंना उत्तर दिलंय.

मेंदूला संसर्ग होण्यासाठी कोरोना जबाबदार असण्याची आवश्यकता नाही, त्यासाठी काँग्रेस नेता असणं पुरेसं असतं, असा टोला अतुल भातकळकर यांनी पटोलेंना लगावला आहे. देशात कोरोनाचा संसर्ग वाढण्यास केंद्रातील मोदी सरकार जबाबदार आहे. तर देशात लसीकरण कमी झाल्यानं मृतांची संख्या वाढत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला होता. महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारच्या निमित्ताने नाना पटोले यांनी पंढरपुरात प्रचार सभा घेतली त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.

मोदी सरकारच्या काळात सात वर्षात सरकारवर 1 लाख कोटी रुपयांचं कर्ज वाढले आहे. प्रतिलिटर 22 रुपयांचा अधिक कर जनतेकडून घेतला जात आहे. शेतकऱ्यांच्या नावानं हे सरकार पैसे गोळा करून लूट करत आहे. 2019 मध्ये देशाच्या सीमा बंद केल्या असत्या तर आज देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी दिसला असता, अशी देखील टीका त्यांनी केली होती.

दरम्यान, देशात सगळीकडे कोरोना पसरू लागला आहे आणि देशाचे पंतप्रधान काय करत आहेत. त्यांना निवडणूकीच पडलंय. जनता इथे कोरोनाने त्रस्त आहे तर पंतप्रधान मस्त आहेत, अशी टीका देखील त्यांनी मोदींवर केली.

थोडक्यात बातम्या-

हरिद्वार कुंभमेळ्यात कोरोनाचं थैमान; इतक्या जणांना झाली कोरोनाची लागण

‘साहेब, घरात पकडलेले उंदीर सोडायला गेलो होतो’; घराबाहेर पडलेल्या तरूणाचं पोलिसांना अजब उत्तर

‘पैसा भी और इज्जत भी’; माॅरिसच्या खेळीवर विरेंद्र सेहवागची गुगली

पीएचा जीव वाचवण्यासाठी गडकरींनी मध्यरात्री उघडायला लावलं बॅंकेचं लॅाकर, 35 लाख केले खर्च!

“पहाटेच्या शपथविधीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More