बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सरकारी तिजोरीतून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना अमोल कोल्हे यांनी ज्ञानामृत पाजावं”

मुंबई | कोरोनाच्या प्रभावामुळे राज्यासह देशाची आर्थिक स्थिती नाजूक बनत चालली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने नव्या संसद भवनावर खर्च न करता ऑक्सिजन प्लांट, कोव्हिड सेंटरवर खर्च करावा, असा सल्ला शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिला होता. त्यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं उदाहरण देत महाविकास आघाडी सरकारवर टिका केली आहे.

देश भयानक परिस्थितीशी झुंजतोय, देशाला नव्या संसद भवनाची नाही तर ऑक्सिजन प्लांट, कोव्हिड सेंटरची जास्त गरज आहे, असं तत्वज्ञान पाजळणाऱ्या अमोल कोल्हे यांनी हे ज्ञानामृत या भयानक परिस्थितीत सरकारी तिजोरीतून 400 कोटी खर्चून वडिलांचे स्मारक बांधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पाजावं, असं टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. दोन महिन्यांपुर्वी बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्धाटन झालं होतं.

देशात दररोज 2 लाखांपेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्याचबरोबर दररोज 1500 लोक आपल्या जवळच्या माणसाला गमावत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने प्राधान्याने नेमकं कोणत्या ठिकाणी पैसे खर्च करावे याबाबत ठरवावे. त्याचबरोबर पंतप्रधान कार्यालयाने MPLAD निधी जाहीर करावे, जेणेकरुन खासदारांना आपापल्या मतदारसंघात आवश्यक उपाययोजना उभारण्यासाठी त्याचा वापर करता येईल, अशी मागणी अमोल कोल्हे यांनी केली होती.

देशात सध्या आरोग्य यंत्रणा आणखी सक्षम करण्याची जास्त आवश्यकता असल्याचं मत अमोल कोल्हेंनी मांडलं आहे. यासाठी केंद्र सरकारने खासदार कोट्यातील निधींची पूर्तता करावी, असंही अमोल कोल्हे म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

‘महाराष्ट्रात आणीबाणी जाहीर करा’; ‘या’ काँग्रेस नेत्याचा ठाकरे सरकारला घरचा आहेर

मित्राच्या बहिणीसोबत जे झालं ते इतरांसोबत होऊ नये’; लोकांना मोफत ऑक्सिजन देणारा अवलिया

मोठी बातमी! शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात

‘गरीब कोरोनाग्रस्तांसाठी माझा पगार घ्या’; भाजी विक्रेत्याच्या मुलाच्या मेसेजने डाॅक्टर भारावले

‘इतकं लाचार कधीच वाटलं नाही…’; कोरोनाची परिस्थिती सांगताना डॉक्टरला अश्रू अनावर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More