बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘गोंधळ आघाडीतला नवा तमाशा’; अतुल भातखळकरांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

मुंबई | महाविकास आघाडी सरकारमधील सगळ्या पक्षांची गुरूवारी एक महत्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये बैठकीमध्ये केंद्र सरकारने केलेल्या नवीन कृषी कायद्यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर केंद्र व राज्य सरकारच्या वादात आम्हाला पडायचे नाही. यावर्षीच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने सादर केलेले कृषी विधेयक मागे घ्यावे, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सांगितलं.

राज्य सरकारने कृषी विधेयके मागे घेतली नाही. तर याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावरून भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकावर हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकारचे कृषी कायदे मान्य नाहीत म्हणून राज्य सरकारने आपले स्वतंत्र कृषी कायदे केले आहेत. आता ते ही महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना मान्य नाहीत. त्यावरून आंदोलन करण्याचा इशारा दिला जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. तसेच त्यांनी गोंधळ आघाडीतला नवा तमाशा, असं म्हणत राज्यातील महाविकास आघाडी सरकारला चांगलंच फटकारलं आहे.

दरम्यान, यावर्षीच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने सादर केलेले कृषी विधेयक सरकार मागे घेणार का?, की त्या कृषी विधेयकावर अडून राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या-

अजित पवार आणि अनिल परबांवर गुन्हा दाखल करुन CBI चौकशी करा, हायकोर्टात याचिका दाखल

दहावीचा निकाल अखेर जाहीर; कोकण विभागाचा सर्वाधिक 100 टक्के निकाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी आहेत, भाजप हा ओबीसींचाच पक्ष – देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन!

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पांडुरंगाच्या दर्शनाचा अधिकार नाही”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More