बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महिना 100 कोटी वसुलीचे तरी कुठे लेखी आदेश दिले होते?”

मुंबई | एनसीबीने कॉर्डेलिया क्रुझवर केलेल्या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात चांगलीच गरमा गरमी पाहायला मिळत आहे. या क्रुझ कारवाईचे नेतृत्व करणारे एनसीबीचे मुंबई विभागीय प्रमुख समीर वानखेडे देखील चांगलेच चर्चेत आले आहेत. वानखेडेंनी कोणीतरी त्यांच्यावर पाळत ठेवून असल्याचा खळबळजनक आरोप केला. यानंतर यावर अनेक प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली.

याप्रकरणी समीर वानखेडेंनी सीसीटीव्ही फुटेजसह मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. समीर वानखेडेंनी तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई पोलिसांकडून पाळत ठेवली जात असल्याची टीका करण्यात आली. मुंबई पोलिसांवर होणारे हे आरोप राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फेटाळून लावले. समीर वानखेडेंवर पाळत ठेवण्याचे कुठलेही आदेश दिले नसल्याचंं वळसे पाटील म्हणाले.

वळसे पाटलांच्या या विधानानंतर भाजप आमदार अतुल भातखळकरांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. समीर वानखेडेंवर पाळत ठेवण्याचे कुठलेही आदेश दिले नसल्याचं म्हणत गृहमंत्र्यांनी आरोप फेटाळले. महिना 100 कोटी वसुलीचे तरी कुठे लेखी आदेश दिले होते? असा खोचक सवाल भातखळकरांनी विचारला आहे.

तर असे आदेश हे तोंडी द्यायचे असतात हे जनतेला ठाऊक आहे वळसे पाटील साहेब, असा टोलाही अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना लगावला आहे. या प्रकरणावरून आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली आहे. एनसीबी अधिकाऱ्यावर पाळत ठेवली जात असल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या-

“मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे..”; फडणवीसांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण

वारकरी सांप्रदायाला पैसा प्रसिद्धीची गरज नाही- शिवलीला पाटील

महाविद्यालये सुरु करण्याबाबत उदय सामंत यांनी दिली महत्त्वाची बातमी

72 तास अन्नत्याग आंदोलनकर्त्या शेतकऱ्याची तब्येत खालावली

महाराष्ट्रात काय पोलीस-पोलीस खेळ सुरू आहे का?, आशिष शेलार संतापले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More