Top News महाराष्ट्र

जगात भ्रष्टाचाराचे नवे उच्चांक प्रस्थापित करणाऱ्यांसाठी असते का एखादे भारतरत्न- भाजप

मुंबई | काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो मायावती यांना भारतरत्न देऊन सन्मानित करायला हवं, असं उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते हरिश रावत यांनी म्हटलं आहे.

हरिश रावतांच्या वक्तव्यावर भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी टोला लगावला आहे. जगात भ्रष्टाचाराचे नवे उच्चांक प्रस्थापित करणाऱ्यांसाठी असते का एखादे भारतरत्न, असं भातखळकरांनी म्हटलं आहे.

सोनिया गांधी आणि मायावती या दोघीही हुशार आणि प्रखर महिला राजकारणी आहेत. दोघींना भारत सरकारनं या दोन्ही व्यक्तिमत्वांचा भारतरत्न देऊन सन्मान करावा, असंही रावत यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, अतुल भातखळकरांनी केलेल्या टीकेवर महाराष्ट्र काँग्रेसकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या-

संभाजी महाराजांबद्दल अ‍ॅलर्जी असेल तर तर दुसरं नाव सांगा- चंद्रकांत पाटील

…तर मग यावर्षीचा प्रजासत्ताक दिन सोहळा रद्द का करू नये?- शशी थरूर

‘…तर नेपाळ भारतात असता’; प्रणब मुखर्जींनी आपल्या अखेरच्या पुस्तकात सांगितली राज की बात

“काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष राहुल गांधी किंवा सोनिया गांधी नाही तर शिवसेना ठरवणार, काँग्रेसचा स्वाभिमान संपला”

तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित शर्माचं पुनरागमन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या