मुंबई | शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयात उशिरा पोहोचल्यावर आता चाप बसणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा जीआर जारी केला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
कामावर उशिरा येणाऱ्या लेटलतिफांना चाप, सरकारकडून नवी नियमावली जाहीर आणि मंत्रालयात न जाणाऱ्या घरकोंबड्यांसाठी सरकारने काही नियमावली जाहीर केली आहे का?, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
महिन्यातून केवळ दोन वेळाच जास्तीत जास्त दीड तास उशिरा येण्याची सवलत असणार आहे. त्यानंतरच्या तिसऱ्या ‘लेटमार्क’साठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची रजा वजा करण्यात येणार आहे.
दरम्यान, ज्या अधिकाऱ्यांना सुट्ट्या कापू नये असे वाटते ते अधिकारी जर दोनपेक्षा अधिक दिवस एक किंवा दीड तास उशिराने ऑफिसात आले तर त्यांना उशिरापर्यंत कार्यालयात काम करावं लागणार आहे.
कामावर उशिरा येणाऱ्या लेटलतिफांना चाप; सरकारकडून नवी नियमावली जाहीर…
आणि मंत्रालयात न जाणाऱ्या घरकोंबड्यांसाठी सरकारने काही नियमावली जाहीर केली आहे का?… pic.twitter.com/x2mnaB1ing— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 3, 2021
थोडक्यात बातम्या-
‘पुण्याचे नामांतर ‘जिजापूर’ करा’; संभाजी ब्रिगेडची मागणी
“लस टोचणं हे स्किल, मलाही कोरोनाची लस द्यायला आवडेल”
औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यास आरपीआयचा विरोध- रामदास आठवले
“जागतिक महामारी विरोधात भारताच्या लढाईतील एक निर्णायक क्षण!”
‘…तर काँग्रेसला खूश केलं असतं’; कंगणा राणावतची उर्मिला मातोंडकरांवर बोचरी टीका