बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एसटी कर्मचारी उपाशीपोटी अन् आदित्य ठाकरेंची जनतेच्या पैशावर स्कॉटलंड वारी”

मुंबई | राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे सध्या सस्कॉटलंड दौऱ्यावर आहेत. सीओपी 26 कॉन्फरन्ससाठी आदित्य ठाकरे स्कॉटलंडला गेले आहेत. पण राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि आदित्य ठाकरे स्कॉटलंड दौऱ्यावर गेले आहेत यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. फक्त पर्यटन आणि प्रतिमा संवर्धनासाठी आदित्य ठाकरे तिथे गेले असल्याचा आरोप भातखळकर यांनी केला आहे.

कोणतेही अधिकृत निमंत्रण नसताना राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे पर्यावरणाच्या नावाखाली अधिकाऱ्यांसोबत पर्यटन सुरू असल्याचा घणाघात भातखळकर यांनी केला आहे. तर या परिषदेला महाराष्ट्र सरकारला अधिकृत निमंत्रण होतं का?, असा सवाल विचारत देशाचे पंतप्रधान एकदा त्या ठिकाणी जाऊन एक भूमिका मांडून आले असताना त्यापेक्षा वेगळी भूमिका मांडण्याचा आधिकार कुठल्याचं राज्याला नसतो, असंही अतुल भातखळकर म्हणालेत.

तर राज्यात इकडे एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी अन् आदित्या ठाकरेंची पर्यावरणाच्या नावाखाली विना निमंत्रण जनतेच्या पैशावर स्कॉटलंड वारी, अशी खोचक टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. तर आदित्य ठाकरेंवर आरोपांच्या फैरी झाडताना या संपूर्ण पर्यटन दौऱ्याचा खर्च हा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून वसूल करावा, अशी मागणीही अतुल भातखळकरांनी राज्य सरकारकडे केली आहे.

अधिकृत निमंत्रण नसताना आदित्य ठाकरे अनेक अधिकाऱ्यांसह का गेले? राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा जीवघेणा संप सुरू असताना परिवहन सचिव का गेले? हे सर्व जण तिथे कोणत्या गाड्या वापरत होते? हे सगळं कुठे राहात होते?, असे सवाल भातखळकर यांनी उपस्थित केले आहेत. तर हा सगळा खर्च राज्य सरकारच्या तिजोरीतून झाला आहे. त्यामुळे या सगळ्याची सखोल चौकशी करावी आणि या दौऱ्याचा सगळा खर्च त्यांच्याकडून वसूल करावा, अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या-

“तुम्ही या देशात आहात की परदेशात? तुमचा ठावठिकाणा आधी सांगा”

“मी प्रत्येक मुर्खाला पाठींबा द्यायला हवा का?”

“एसटी कर्मचाऱ्यांनी रक्त आटवणे म्हणजे भिंतीवर डोके फोडून घेण्यासारखे”

निवडणुकीच्या तोंडावर नाना पटोले फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

“अनिल देशमुखांना बोगस केसमध्ये अडकवण्याचा राजकीय डाव आम्ही उलटवून लावू”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More