बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि ते परत घरात दिसेनासे झाले”

मुंबई | दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नव्या प्रकाराने थैमान घालायला सुरूवात केली आहे. वेगाने पसरत असलेल्या या ओमिक्रॉन प्रकाराने जगभराची चिंता वाढवली आहे. त्यात द. आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोनाबाधित आढळल्याने राज्य प्रशासनही सतर्क झालं आहे.

ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या (Corona Virus New Strain Omikron) प्रकारच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. कोरोनाला रोखण्यासाठी जे आवश्यक आहे ते सर्व करा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांनंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

भातखळकरांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. कोरोना रोखण्यासाठी जे आवश्यक आहे ते सर्व करा मुख्यमंत्री ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि ते परत घरात दिसेनासे झाले, असा खोचक टोला अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

दरम्यान, कोरोनाच्या नव्या विषाणूला थोपवण्यासाठी राज्य सरकार सज्ज झालं आहे. कोरोनाला थोपवायचं असेल आणि लॉकडाऊन (Lockdown) टाळायचं असेल तर आरोग्याची बंधनं पाळावी लागतील असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना केलं आहे. तसेच परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवरही विशेष लक्ष ठेवलं जात आहे.

 

थोडक्यात बातम्या-

अखेर बहूचर्चित आणि वादग्रस्त कृषी कायदे लोकसभेत रद्द

‘राज्य सरकार अधिवेशनापासून दुर पळत आहे’

1 तारखेला शाळा सुरु होणार?, ओमिक्राॅन विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी ‘ही’ दिली माहिती

ठाकरे सरकारचे तीन नवे नेते किरीट सोमय्यांच्या रडारवर; लवकरच करणार खुलासा

पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, तब्बल एवढ्या गावात झालं 100% लसीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More