बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरे पेपर फुटल्यामुळे पास झालेले मुख्यमंत्री”

मुंबई | देशाच्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरूवात झाली (Assembly Election Results 2022). पाचही राज्यातील निकाल हाती यायला आता सुरूवात झाली आहे. निवडणुक झालेल्या 4 राज्यांत भाजपने आघाडी घेतली आहे.

यंदाच्या उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात शिवसेना (Shivsena) देखील उतरली होती. मात्र, गोवा आणि उत्तर प्रदेशात शिवसेनेला आपलं खातंही उघडता आलं नाही. या निकालावरून भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेनेसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

निवडणुक झालेल्या पाच पैकी चार राज्यात आधीही भाजपाच होती आणि विरोधकांनी कितीही टीका केली तरी आताही भाजपाच येणार आहे, असा विश्वास अतुल भातखळकर यांनी व्यक्त केला. तर हे परफॉर्मन्सचे यश आहे. महाराष्ट्रात शिवसेनेला ते कधीही शक्य होणार नाही कारण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पेपर फुटल्यामुळे पास झालेले मुख्यमंत्री आहेत, असा घणाघात अतुल भातखळकर यांनी केली आहे.

दरम्यान, गोवा आणि उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेना संपूर्ण ताकदीने उतरली होती. दोन्ही राज्यात शिवसेनेच्या प्रचारसभा देखील झाल्या होत्या. मात्र, या दोन्ही राज्यात शिवसेनेचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. तर पाच पैकी चार राज्यांत भाजपने आघाडी घेतली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

पंजाबमध्ये सत्तापरिवर्तन; आपकडून काँग्रेसचा सुपडा साफ

“येत्या काही दिवसांत अरविंद केजरीवाल पंतप्रधान होतील”

“पदरात काहीच नाही, तरीही 2024 मध्ये पंतप्रधान त्यांचाच”

सर्वात मोठी बातमी! पणजी मतदार संघातून उत्पल पर्रीकर यांचा पराभव

महाराष्ट्राच्या बाहेर शिवेसनेच्या ‘फ्लाॅप शो’वर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More