बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भंगारवाल्याचा करेक्ट कार्यक्रम झाला’, भाजपचा हल्लाबोल

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने जोरदार झटका दिला आहे. ईडीने पहाटेच नवाब मलिक यांच्यावर कारवाई केली व चौकशीसाठी ताब्यात घेतलं. नवाब मलिकांवरील कारवाईनंतर राजकारण चांगलच ढवळून निघालं.

नवाब मलिकांवरील कारवाईनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. केंद्रांच्या विरोधात जे स्पष्ट भूमिका मांडतात त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न असल्याचा घणाघात शरद पवार यांनी केला होता. तर केंद्रीय तपास यंत्रणा या फक्त भाजपविरोधी पक्षांसाठीच बनल्या आहेत का?, असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

ईडीने मलिकांवर कारवाई केल्यानंतर भाजपने मलिकांना टोला लगावला आहे. भंगारवाल्याचा करेक्ट कार्यक्रम झाला, असा टोला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी लगवला आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विट करत मलिकांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, नवाब मलिकांची अंडरवर्ल्डशी निगडीत काही मालमत्ता आहे का?, याची चौकशी ईडीकडून सुरू आहे. नवाब मलिकांच्या चौकशीनंतर यातून काय माहिती समोर येणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“प्रत्येकाला देशासाठी कुर्बान व्हावं लागेल, आता हौतात्म्य आलं तरी चालेल”

नवाब मलिकांवरील कारवाईनंतर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

दूध ना साखर, ब्लॅक कॉफीचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?

मोठी बातमी! नवाब मलिक ईडीच्या कार्यालयात, चौकशीला सुरूवात

नोकरी करत करू शकता ‘हा’ व्यवसाय, महिन्याला मिळतील जास्तीचे 30 हजार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More