बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नवाब मलिकांचा त्यांचाच गृहमंत्र्यांवर विश्वास नाही का?”

मुंबई | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणापासून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) चांगलेच चर्चेत आले आहेत. नवाब मलिकांनी केलेल्या अनेक गौप्यस्फोटांनी राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. त्यात नवाब मलिकांनी केलेल्या नव्या ट्वीटची (Nawab Malik Tweet) सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

नवाब मलिकांनी दोन जणांचे फोटो ट्वीट करत ते त्यांच्या घराची ‘रेकी’ करत असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. माझ्या घरावर आणि शाळेवर पाळत ठेवली जात असून याविरोधात मी कमिशनर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं मलिक म्हणाले होते. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी नवाब मलिकांवर निशाणा साधला आहे.

नवाब मलिक स्वत: कॅबिनेट मंत्री आहेत. राज्याचे गृहमंत्रीही त्यांच्याच पक्षाचे आहेत. मग आपल्या घरावर पाळत ठेवली जाते ही तक्रार ते ट्वीट करून का करतात? असा सवाल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. तर तुमचा तुमच्या गृहमंत्र्यावरही विश्वास नाही का? असा खोचक सवालही अतुल भातखळकर यांनी विचारला आहे. (Atul Bhatkhalkar Criticises Nawab Malik)

दरम्यान, ‘माझ्या विरोधात षडयंत्र चालू आहे. अनिल देशमुख यांच्याप्रमाणे माझ्यावरही आरोप करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जो खेळ अनिल देशमुखांसोबत झाला तोच खेळ माझ्यासोबतही केला जात आहे,’ असा गंभीर आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

नव्या व्हेरिएंटमुळे नवे निर्बंध? अजित पवारांनी दिले संकेत, म्हणाले…

परमबीर सिंह यांचा पाय आणखी खोलात; मुंबईत येताच अडचणी वाढल्या

‘वडिल पुस्तकाला पैसे देत नाहीत, रोज दारु पितात’, मुलाचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल

“विदेशी माध्यमांना भारताचा विकास पचत नाही”

एसटी आंदोलनावरुन जितेंद्र आव्हाडांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More