“पवार साहेब, उतार वयात विस्मरणाचा रोग जडला की कोलांट्या मारण्याची सवय?”
मुंबई | महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद यांच्यासह इतरांनी स्वातंंत्र्यासाठी योगदान दिलं. देश उभारण्यासाठी कष्ट केले. मात्र, त्यांचा सन्मान, आदर ठेवण्याऐवजी त्यांच्यावर टीका टीप्पणी करण्यात धन्याता मानणारं नेतृत्त्व देशात पाहायला मिळत आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं होतं.
शरद पवारांच्या या वक्तव्याचा आधार घेत भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शरद पवारांवर खोचक शब्दात टीका केली आहे. शरद पवारांनी दोनदा तीच काँग्रेस (Congress) फोडली असल्याचं म्हणत भातखळकर यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.
अहो पवारसाहेब दोनदा तीच काँग्रेस फोडलीत तुम्ही. उतार वयात विस्मरणाचा रोग जडला की कोलांट्या मारण्याची सवय?, अशी खोचक टीका भातखळकर यांनी केली आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विट करत शरद पवारांवर हल्लाबोल केला.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. भाजप (BJP) विरूद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) वाद शिगेला पोहोचला असताना भातखळकरांनी शरद पवारांवर टीका केली. या टीकेला राष्ट्रवादीकडून (Ncp) काय प्रत्युत्तर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
अहो पवारसाहेब दोनदा तीच काँग्रेस फोडलीत तुम्ही. उतार वयात विस्मरणाचा रोग जडला की कोलांट्या मारण्याची सवय??? https://t.co/oV3ZPC00RJ
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 2, 2022
थोडक्यात बातम्या-
Raj Thackeray: “जो माणूस इतिहास विसरला, त्याच्या पायाखालचा भूगोल सटकला”
“हिंदू म्हणून आपण एक कधी होणार?”, राज ठाकरेंचा सवाल
जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार – राज ठाकरे
Raj Thackeray: “झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदरशांवर धाडी टाका”, राज ठाकरेंची मागणी
Raj Thackeray: “सकाळी पाहतो काय, तर जोडा वेगळाच”; पहाटेच्या शपथविधीवरून राज ठाकरेंचा टोला
Comments are closed.