बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“खरा सचिन वाझे मंत्रालयावर होता की सिल्वर ओकवर?”

मुंबई | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयने गुन्हा दाखल करुन छापेमारी केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपानंतर,  अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर सीबीआयच्या विविध पथकांनी देशमुख यांच्या तब्बल 10 ठिकाणांवर छापे मारले. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे.

एका अनिलवर कारवाई पुरेशी नाही. खरा सचिन वाझे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर होता की सिल्वर ओकवर?, असा सवाल अतुल भातखळकर यांनी विचारला आहे. अनिल देशमुखांवर झालेली कारवाई म्हणजे भ्रष्ट आणि सूडबुद्धीने राबवलेल्या सत्तेचे स्वाभाविक परिणाम आहे. त्यामुळं खंडण्या वसूल करणारा खरा सचिन वाझे कोण हे आता उघड होईलच. शेवटी ना खाऊंगा ना खाने दूंगा हेच मोदी सरकारचे सूत्र आहे, अशी टीका अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीवर केली आहे.

सीबीआयचा एक अजेंडा आहे. कोर्टाची ऑर्डर आहे. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. त्यामुळे सीबीआयच्या कारवाईवर लगेचच प्रतिक्रिया व्यक्त करणं योग्य नाही, असं संजय राऊत म्हणालेत. सीबीआयचा प्राथमिक रिपोर्ट कोर्टाकडे जाईल. त्यानंतर काय करायचं ते पाहू. सीबीआय त्यांचं काम करत आहे. कोर्टाने आपलं काम केलं आहे. महाविकास आघाडी सरकारही आपलं काम करत आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, सीबीआयच्या विविध पथकांनी देशमुख यांच्या तब्बल 10 ठिकाणांवर छापे मारले. याआधी त्यांची 10 तास चौकशी झाली होती. अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने सीबीआय देशमुखांना अटक करेल का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“अनिल देशमुखांवर झालेली कारवाई ही सोची समझी चाल, लवकरच दूध का दूध पाणी का पाणी होईल”

अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल; संजय राऊत म्हणाले ‘कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही’

सलग 15 व्या दिवशी मुंबईत लोकलला प्रचंड गर्दी; ‘मुंबईकरांनो हे वागणं बरं नव्हं!’

अयोध्या वादावर शाहरूख खाननं सुचवला होता हा तोडगा; शरद बोबडेंच्या निरोप समारंभात मोठा खुलासा

‘फी भरली नाही म्हणून परिक्षेला बसू न दिल्यास…’; शिक्षण विभागाने केलं हे महत्वाचं आवाहन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More