“दिल्लीला जाऊन मॅडमची लुगडी धुणाऱ्या लाचार सम्राटांनी…”
मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknah Shinde) हे दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना एकनाथ शिंदे हे कर्नाटकातील भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. यावरून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर (Eknah Shinde) टीका केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोम्मईंची भांडी घासायला कर्नाटकमध्ये गेले असल्याची टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रत्नागिरीतील जाहीर सभेत केली.
उद्धव ठाकरे यांच्या टीकेला आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केलीये.
दिल्लीला जाऊन मॅडमची लुगडी धुणाऱ्या लाचार सम्राटांनी मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना तारतम्य बाळगावे ही माफक अपेक्षा. सत्ता गेल्याने पार वेडेपिसे झाले आहेत, अशी बोचरी टीका अतुल भातखळकर यांनी केलीये.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.