महाराष्ट्र मुंबई

“जनतेने नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवलंय, ते सुपारीबाज आंदोलकांना भीक घालणार नाहीत”

मुंबई | कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांनी या कायद्याला कडाडून विरोध केला आहे. दिल्लीमध्ये या कायद्यांविरोधात तीव्र आंदोलन छेडलं आहे. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनीही या आंदोलनात सहभाग नोंदवला.

कृषी कायद्यांवर चर्चा होऊच शकत नाही, तो मागेच घ्यावा लागेल, असं मेधा पाटकर म्हणाल्या. मेधा पाटकर यांच्या या भूमिकेवरून अतुल भातखळखर यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

देशाच्या जनतेने नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवलं आहे. ते तुमच्या सारख्या सुपारीबाज आंदोलकांना भीक घालणार नाहीत, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलंय.

दमबाजी कुणाला करताय? देशाच्या जनतेने घसघशीत मतदान करुन नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवले आहे. ते तुमच्या सारख्या भपकेबाज आंदोलकांना भीक घालणार नाहीत. तुमची दमबाजी मोडूनच काढायला हवी, असं अतुल भातखळकर म्हणाले.

 

 

 

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! फडणवीसांच्या मंत्रिमंडळात काम केलेल्या ‘या’ माजी मंत्र्याचं निधन!

“रिलायन्सच्या सर्व वस्तूंवर बहिष्कार टाकणार, अंबानी-अदानींच्या पेट्रोल पंपावरही जाणार नाही”

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना आता मिळणार ‘ही’ शिक्षा; ‘शक्ती’ विधेयक तयार करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

“भाजपने कुठलीही पालिका निवडणूक लढवावी, त्यांचा पराभव निश्चित”

‘ग्लोबल टीचर’ रणजीत डिसले यांना कोरोनाची लागण!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या