बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुमचा 51 वर्षीय युवा नेता निवडणुकीत सतत मार खाऊन दाढीची खुंट वाढवत फिरतोय”

मुंबई | आगामी निवडणुकीत दिल्लीतील दोन्ही दाढीवाल्यांचे शटर बंद करायचे आहे. एवढंच आपल लक्ष्य आहे, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला होता.

खोटं बोल, पण रेटून बोल, असे लोक सत्तेमध्ये आले असून मागील सात वर्षांत जी व्यवस्था काँग्रेस पक्षाने उभी केली होती. ती सध्याच्या केंद्रातील सत्ताधारी पक्षाने मोडकळीस आणली, असा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या दाढीवाल्यांनी सामान्य लोकांना नोटबंदीवेळी लाईनमध्ये लावून मारलं. देशात तेव्हापासूनच महागाई वाढू लागली आहे. आता देशाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नसेल, असं नाना पोटोले म्हणालेत. नाना पटोलेंच्या या टकेला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सध्या तुमचा 51 वर्षीय युवा नेता निवडणुकीत सतत मार खाऊन दाढीची खुंट वाढवत फिरतोय ते पाहा, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

दरम्यान, गोव्यात एका कार्यक्रमात पंतप्रधान म्हणजेच आता नकली दाढी वाढवलेल्या व्यक्तीने सांगितलं होतं, की मला 50 दिवस द्या. जर नोटबंदी फसली, तर मला कोणत्याही चौकात आपण द्याल ती शिक्षा हा प्रधानसेवक घेण्यास तयार आहे. मग आता त्याचं काय झालं?, असा सवाल देखील नाना पटोले यांनी उपस्थित केला.

थोडक्यात बातम्या- 

“दिल्लीतील दोन्ही दाढीवाल्यांचे शटर बंद करायचं हेच आपलं लक्ष्य”

काँग्रेस जर स्वबळावर अडून राहिली तर…- जयंत पाटील

18 वर्षावरील सर्वांचं आजपासून मोफत लसीकरण, जाणून घ्या संपूर्ण माहिती

शरद पवार दिल्लीला रवाना; विरोधी पक्षातील विविध नेत्यांना भेटणार

“मागास रिपोर्ट मराठा समाजाचा आरसा, पन्नास टक्के मर्यादेचा मुद्दा संपुष्टात येईल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More