बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला”

मुंबई | कोरोना संकटाच्या काळात अनेक व्यवसाय-धंद्यांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे.

लॉकडाऊनमुळं  राज्यातील हॉटेल व्यावसायिक पर्यटन उद्योग तसेच इतर व्यावसायिक अडचणीत आले आहेत. या अडचणीत त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने त्यांना वीज बिलात आणि मालमत्ता करात सवलत द्यावी, अशी मागणी शरद पवारांनी केलीये. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी पवारांवर निशाणा साधलाय.

माननीय पवार साहेबांनी बारमालकांना वीज बिलात सवलत द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, याच कळकळीने आपण शेतकऱ्यांसाठीही एखादे पत्र पाठवाल अशी अपेक्षा आहे. 100 कोटींच्या बोजाने दबलेल्या बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला आहे हे मी नमूद करू इच्छितो, असा टोला भातखळकर यांनी शरद पवारांना लगावला आहे.

प्रकृती सावरल्यावर आपण सर्वप्रथम बार मालकांसाठी आवाज उठवलात, बहुधा मराठा आरक्षणाचे वृत्त आपल्या कानावर आले नसावे. बार मालकांच्या प्रकरणातून वेळ मिळाला तर थोडं तिथेही लक्ष द्या. मराठा समाज आशेने आपल्याकडे पाहतोय, असं ट्वीटही भातखळकर यांनी केलंय.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

‘हॉटेल, पर्यटन व्यावसायिकांना मदत करा’; शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्रातील ‘या’ गावाचा घ्यावा सर्वांनी आदर्श, एकालाही नाही झाली कोरोनाची लागण

सिस्टम नव्हे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व फेल झालं- सोनिया गांधी

मोठी बातमी! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात आणखी तीन दिवसांचा लॉकडाउन वाढवला

शरद पवार-सुप्रिया सुळे यांचा मुंबईत फेरफटका, पाहा शरद पवारांचा लाईव्ह व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More